म्हातारपण देगा देवा?


बालपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा,
म्हातारपण ना देगा देवा?
स्थलांतरित पक्षांचा थवा?..


बालपणी भातुकलीचा
मांडूणी संसार बघणं,
भातुकलीच्या संसाराला
म्हातारपणी का लागते ग्रहणं?..

"साठी बुद्धी नाठी"
म्हणे सारे जग,
"साठी भेटी गाठी"
का बरे नसते मग?..

हिनवुनि येता जाता
लागला म्हातारचळ,
उभे राहू सोबत,
देऊन पाहु म्हातारबळ..

मोठे झाले की लागतो,
येऊ बापाचा बूट,
आई मोठ्याकडे, बाप लहान्याकडे,
का अशी ताटातुट?

वेचले ज्यांनी आयुष्य
करिता मुलांची सेवा,
का बरे वाटावे त्यांना
म्हातारपण नको ना देगा देवा..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी