Posts

Showing posts from May, 2017

सोशल होने की दौड़ में..

मेरी एक कविता गुलजार जी की कविता से प्रेरित होके.. सोशल होने की दौड़ में, अपनों से मिलना ही रह गया...। हम कर पाए पोस्ट रोज फेसबुक पर मगर दिल तनहा ही रह गया ! बचपन में जहां चाहा किसीसे भी दोस्ती करते थे.. आज फ्रेंड रिक़्वेस्ट बिना भेजे किसीसे दोस्ती करना मुश्किल सा हो गया .. पर अब दिल को दोस्ती चाहिए और दिमाग को दुनियादारी! हम भी अपनों से मिलते थे बिना अपॉइंटमेन्ट लेके शेअर करते थे दिल की बात बिना किसी परवाह से.. देखा है आज खुद को अकेला भरी हुई फ्रेंड लिस्ट में! चलो अपनों से मिलते है बिना वजह ढूंढे.. कभी तुम मेरे घर आके! कभी मैं तुम्हारे घर आके! - संतोष पवार

आई

Image

गुलाबाच्या फुला

गुलाबाच्या फुला माझ्या सुगंध तुझा दरवळू दे.. काटे टोचतात रे तुला तोडताना हळुवार तुला पकडू दे।। पाकळ्या पाकळ्या झाले शरीर तुझे हृदयावर झटके मात्र तू घेतोस.. किती तो दयाळू पणा तुझा विखुरल्यावरही गुलकंद बनून गोडवा तू देतोस।। -संतोष पवार

बिनधास्त

वाटते कधीतरी होऊन जावे बिनधास्त, उधळून दयाव्या साऱ्या मर्यादा.. वेडात दौडलेल्या वीर मराठ्यां सारखे सुसाट, कशाचीही पर्वा न करता भिडून जावे समस्यांसोबत.. फडशा पाडून टाकावा साऱ्या समस्यांचा, दोन हात करावे चितपट होई पर्यंत.. मनाला उधाण आल्यागत वळवाच्या पावसा सारखे धो धो बरसावे काही क्षणात करावे सगळी कडे पाणी पाणी, खेळावे चिखलात, माराव्या उडया गुढगाभर पाय भरे पर्यंत.. मग अचानक झोप मोडते, स्वप्न तुटते आरशात बघतो तर तोच नकली सभ्यतेचे कवच घालून उभा राहिलेला मीच माझ्यासमोर, प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत जसा विचारतोय का नाही होत मग बिनधास्त? का नाही वागत बिनधास्त? का नाही जगून बघत एखादा दिवस उनाड पणे?? -संतोष पवार

रक्तभांबाळ मन

Image

स्वच्छन्दि

Image

सारे कसे क्षणभंगुर

फुलावर मध मधेतील गोड़वा आले फुलपाखरू गेला गोड़वा, फुल एकाकी सारे कसे क्षणभंगुर.. पाणीदार डोळे डोळ्यातील प्रेम आले अश्रु गेले वाहून प्रेम, डोळे स्वच्छ सारे कसे क्षणभंगुर.. माणसाची मानुसकी मानुसकी मधले आपलेपण आला पैसा मेली मानुसकी, जिंकला स्वार्थ सारे कसे क्षणभंगुर.. दाटले ढग ढगातील वर्षा कोसळला अवेळी पिकांचा नायनाट, शेतकरी फासावर सारे कसे क्षणभंगुर.. -संतोष पवार

दारिद्र्याचा चेहरा

भूक मागते खायला, तहान मागते प्यायला.. अंग मागते झाकायला, गरीबी लावते वाकायला.. कितीही असुदेत कणखर बाणा, दारिद्र्याचा चेहरा मात्र नेहमीच केविलवाना.. निवाऱ्याला आभाळाचे छत्र, सोबतिला कोणीही नसतो मित्र, बायको पोरांचे नुसते हाल, खळीच्या नावाखाली आत गेलेले गाल, मोडून पडला आहे पाठीचा कणा, दारिद्र्याचा चेहरा मात्र नेहमीच केविलवाना.. शाळेत जाइनात पोर भरायला नाही फी, दप्तर घ्यायलाही पैसे नाही किती बेबस मी.. दरवर्षी जोमाने कसतो मी शेती, पीके जळून जावून उरते फ़क्त माती.. दुष्ट नभा, बरस रे कधीतरी माझ्या ही अंगना, दारिद्र्याचा चेहरा मात्र नेहमीच केविलवाना.. -संतोष पवार

।।इलेक्शन स्पेशल।।

बोका म्हणतो आहे ओरबाडू का मांजराला, आमचाच लाल म्हणते आहे माकड़ वानराला, गाय म्हणावनारे ओळखत नाहियेत स्वतःच्याच वासराला, आजकाल जरा जास्तच भाव चढला आहे गाजराला.. कोणी कोणाचे फोड़ते आहे थोबाड़, कोणी कोणाचे काढ़ते आहे बाहेर घबाड़, जाहीरनाम्या च्या नावा ख़ाली वाटत आहेत कबाड़, जनता मात्र ओळखून आहे कोण आहे सगळ्यात लबाड़.. कोणी घालतो आहे शपथ तर कोणी साकड़े, हा माझा तो तुझा कमी जास्त करत आहेत आकड़े, कोणाला म्हणत आहेत मावळा तर कोणी खंडू खोपड़े, शेवटी ज्या झाडाला जास्त फळे त्यावर सगळ्यात जास्त माकड़े.. -संतोष पवार

!!निवडणूक निकाल स्पेशल!!

बोक्याला दिसेल आता आपली साथीदार मांजरात, माकड बोलेल जास्त फरक नाही आपल्यात आणि वानरात, गायीला अचानक आपला बाब्या दिसायला लागेल वासरात, डोळे होतील पारदर्शक, कारण विटामिन ए असते गाजरात.. फोडणारे हातच रंगवतील गुलालाने थोबाड, आता मिळून मिसळून भरतील पाच वर्ष घबाड, घोटाळा झालाच तर पेटवून देतील कार्यालयातील कबाड, आता सगळेच होतील सोज्वळ, कोणीच नाही उरणार लबाड.. होतील वैरी ही एकत्र आणि करतील प्रेमाने संसार, आकडे जुळवण्यात आहेत हे एकदम माहीर आणि हुशार, जुनी लावलेली रोपे उखडून करतील पेरणी दुबार, लोकांनी निवडून दिलेला मात्र पाच वर्ष होईल पसार.. - संतोष पवार

मराठी राजभाषा दिन

नशीब आमचे आम्ही मराठी, प्राण आमचा महाराष्ट्रा साठी.. बोली बोलतो मंजुळवाणी, आशा लता ची सुरेख गाणी.. देशी विदेशी आमचे सत्कार, सचिन चे जसे चौकार शटकार.. महाराजांचे किल्ले एक उत्कृष्ट नमुना, गुणवत्तेतही अव्वल मराठी सिनेमा.. मुंबई पुणे तंत्रज्ञानाचा मनोरा, सुन्दरतेचे प्रतिक कोकण चा किनारा.. जपतो आठवणी प्रत्येक क्षणाच्या, देतो शुभेच्छा मराठी राजभाषा दिनाच्या.. -संतोष पवार

सारे कसे virtual

डोळे उघडले की सारे कसे virtual.. नाती, आपलेपणा, दुरावा सगळे virtual.. प्रेमाची मिठी virtual, आपल्यांसोबतच्या गाठीभेटी virtual.. रुसवा फुगवा virtual, आपलेपणाचा जोगवा virtual.. नवीन नात्याचा आरंभ virtual, चांगल्या कामाचा शुभारंभ virtual.. सण साजरे करणे virtual, मित्रांच्या घरी भेटायचे ठरणे virtual.. मंदिरांचे आकर्षण virtual, बाप्पाचे ही दर्शन virtual.. कधी येणार बाहेर आपण ह्या virtual जगातून, थोडे डोके बाजूला ठेऊन विचार करा हृदयाच्या आतून.. बंद करूया स्वतःचाच स्वतःशी होणारा छळ virtual, कारण एक दिवस कोणीही नसताना येईल छातीत कळ, आणि ती नक्कीच नसेल virtual... -संतोष पवार

एप्रिल फुल

बकरी ने पांघरले टायगर चे ऊल, आरशात बघून बोलली कशी दिसते मी कुल.. नाचली जशी लडकी ब्युटीफुल बन गयी चूल, घातली नाकात नथ आणि कानात डूल.. बोलली आता फिगर मेंटेन करू, नको अजून एकही मुल, आता बाहेरच जेवायचे घरात बंद करून चुल.. स्वतःचे केले सेट एकदम कडक रुल, आता फक्त मौज मज्जा आणि मस्ती मध्ये झूल.. झोप मोडली शिकारी पाहुन आणि मग झाली सुमडीत गुल, स्वप्न तुटले आणि झाले बिचारीचे एप्रिल फुल.. -संतोष पवार

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी

शरीरावर खोचलेले तीक्ष्ण बाण, छिन्नविच्छिन्न झालेला स्वाभिमान.. डोळ्यासमोर गर्द अंधार आणि काळेकुट्ट आभाळ, उपटून काढ बाण नि होऊ दे काया रक्तभांबाळं.. वाहूदे त्या लाल रंगाला मनसोक्त, धमन्या ही होऊदेत अशक्त.. ना ओढायला वस्त्र ना आडोशाला छत्र, कमजोर पडू नको देऊस मन तुझे मात्र.. उठ मर्दा, घे भरारी उंच आकाशी, प्रतिज्ञा कर नाही ठेवणार बायको पोरं उपाशी.. अरे नको उपकार, नको कुणाची मेहेरबानी, परिस्थितीशी लढ जो पर्यंत शरीरात थेंबभर पाणी.. -संतोष पवार

चला ना राया थंड हवेच्या ठिकाणी..

सूर्य मारतोय जोरात थापडी, कानाखाली होतंय लाल.. अंग सोडतंय डिस्टिल्ड पाणी, टॅन झालेत हात आणि गाल.. लाही लाही झाली अंगाची, वाजली तोंडाची पिपाणी, चला ना राया जाऊन येऊ थंड हवेच्या ठिकाणी.. बिच्चारा पंखा ही दमला घालून हवा, अंगाला हात लावला की वाटतो गरम तवा.. स्वयंपाक करताना घामाने होई खारट भाजी, ताटात वाढली की ना कळे शिळी आहे की ताजी.. लग्ना आधी तर बोलले होतात ठेवील तुला जशी राजाची राणी, चला ना राया जाऊन येऊ थंड हवेच्या ठिकाणी.. दुपारी बाहेर पडायची नाही राहिली सोय, कूलर, एसी बिघडल्या सारखे वाटतोय.. फ्रिज मधल्या ही सारख्या संपतात पाण्याच्या बाटल्या, वीजबिल बघून मात्र पर्सही माझ्या फाटल्या.. शेवटचे सांगते नाहीतर येईल घरात आणीबाणी, चला ना राया जाऊन येऊ थंड हवेच्या ठिकाणी.. -संतोष पवार

समुद्र

न बोलता ही सांगून जातात खुप काही समुद्राच्या लाटा, दिशा नसताना ही स्वतः शोधतात क्षितिजा पालिकडच्या वाटा.. निरंतर राग आणि शांत पणाची भरती आणि ओहोटी, सामावून घेतो प्रत्येक गोष्ट असो मोठी वा छोटी.. तू माणसाचे आणि पक्षांचे ही लज्जतदार खाद्य, तुझ्या लाटा म्हणजे नाचण्याच्या गाण्यावर वाजवलेले सुरेल वाद्य.. तू कधी प्रेमळ, कधी रागीट तर कधी होतोस एकदमच भयंकर, किती वर्षाचा आहेस तू? बाळ, तरुण की एकदमच वयस्कर.. -संतोष पवार

फांदीची व्यथा

फांदी बोले पानाला तुझ्यामुळे नाही बघत कोणी मला, दिसायला ही तूच सुंदर खरबुडे अंग मात्र दिले मजला.. तुझ्या हळुवार स्पर्शाने येती अंगावर रोमांच, मला तर दूरवरून बघूनही येई अंगाला खाज उगाच.. तू कधी हिरवा, कधी पिवळा कधी सोनेरी तर कधी होतोस लाल, तू पडून गेल्यावर होते मी अजीर्ण आणि सुकतात माझे गाल.. तू आहेस ताजा तजेलदार म्हणून आहे मला महत्व, पण मी जर मान टाकली तर तुलाही नसेल अस्तित्व.. -संतोष पवार

प्रेम

ओढ तुझी, आस तुझी, जसा निद्रेचा भुकेला मी कुंभकर्ण.. मी ही स्वप्नी तुला शोधिले, द्वेषास न पात्र हा काळा वर्ण.. फांदीला ही प्रेम जडले, ना सोडवी ते पिकलेले पर्ण.. एकदा प्रेमाने जिंकू दे बोल पत्करील मी ही लढाई हरणं.. माग तुला जे हवे ते सखे, प्राणही देईल हा दानवीर कर्ण.. जीव हा माझा गुंतला तुझ्यात, मान डोलावून कर एकदा उत्तीर्ण.. -संतोष पवार

आयुष्याचा सारीपाट

निळ्याशार आभाळात, वाटून घेऊया तारकांना, चार तुझ्या, चार माझ्या मांडुया आयुष्याचा सारीपाट.. कधी येशील बाहेर तू, तोडुनी फाश आकाशगंगेचे, झालो जरी उल्का आपण, खाली येताना तरी नक्कीच पडेल गाठ.. दाट अंधाऱ्या रात्रीही, निरखूनी दुधाळ तेजोमेघ, गर्दीतूनी असंख्य तारकांच्या, शोधुया आपुली प्रकाशमय वाट.. कधी येईल आडवा शनी, मंगळ ही असुदेत राशी मध्ये, नभही देतील गर्जूनी संगीत, मांडूया भातुकलीच्या लग्नाचा थाट.. -संतोष पवार

रविवार स्पेशल

रोहू, काटला की असुदे सुरमई, हलवा, पापलेट चा रेट खूपच हाय.. नुसत्या विचारानेच सुटते तोंडाला पाणी, अरे होऊन जाऊदे ना भाय मग मच्छी फ्राय.. आयुष्यापेक्षा तरी कमीच असतात त्यामध्ये काटे, छोटे छोटे तर असेच पोटात जाय.. रवा, तांदळाचे पीठ लावून करू मॅरीनेशन, अरे होऊन जाऊदे ना भाय मग मच्छी फ्राय.. कडकीच्या काळात मांदेली घरी, पगार झाल्यावर पापलेट शिवाय खायचे नाय.. काय ते म्हणे ओमेगा वगैरे पण असते, म्हणून तरी होऊन जाऊदे ना भाय मग मच्छी फ्राय.. -संतोष पवार

काडीमोड

कोंबडा कोंबडीचे झाले भांडण, कोंबडीने केले कोंबड्याच्या वागण्याचे खंडण, तिला मोडायची होती कोंबड्याची खोड, कोर्टात गेली आणि बोलली पाहिजे काडीमोड.. न्यायाधीश महाराज होते शांत, साक्षीला बोलावून घेतले तालुक्याचे प्रांत, कोंबडा रडून बोलला चूक झाली घोड, कोंबडी ऐकेना बोलली पाहिजे काडीमोड.. वकील लागले मांडू कोंबडीची बाजू, वैयक्तिक प्रश्न ऐकून तीही लागली थोडीशी लाजू, बोलले दाखव तुला केलेली कोंबड्याने मारझोड, शारीरिक हिंसेला नाही माफी, नक्कीच मिळेल काडीमोड.. कोंबडा आता लागला करायला गयावया, पिल्लांची शपथ घेऊन बोलला खूप करील माया, माफ कर मला आणि राग आता सोड, मरून जाईल मी जर मागशील तू काडीमोड.. कोंबडीला ही आठवल्या गोष्टी जुन्या , प्रेमाने हसून म्हणायची माझा सोन्या, कोर्टात म्हणाली आमचे साहेब आहेत तसे गोड, घेते अर्ज मागे, नको आता कधी काडीमोड.. -संतोष पवार

पहिला पाऊस

थेंब ओघळतो बटांवरी तुझ्या, चेहर्या वरी त्या पारंब्यांचे झोके.. शब्दांची ही बसेल वाचा, खूप काही बोलूनही भासतात मुके.. ओघळताना कधी येती गालावरी, सौंदर्याने ते तुझ्या रस्ता चुके.. नयनांना झाके गालिचा मखमली, रिमझिम पावसातील दाट धुके.. हळूवार स्पर्शा ने रोमांच जागवी, हृदयी ठाव घ्यायला ते ही भुके.. करशील जरी बटा कोरड्या, ओले मन जिद्दी ते, ठरवूनही ना सुके.. -संतोष पवार

म्हातारपण देगा देवा?

बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, म्हातारपण ना देगा देवा? स्थलांतरित पक्षांचा थवा?.. बालपणी भातुकलीचा मांडूणी संसार बघणं, भातुकलीच्या संसाराला म्हातारपणी का लागते ग्रहणं?.. "साठी बुद्धी नाठी" म्हणे सारे जग, "साठी भेटी गाठी" का बरे नसते मग?.. हिनवुनि येता जाता लागला म्हातारचळ, उभे राहू सोबत, देऊन पाहु म्हातारबळ.. मोठे झाले की लागतो, येऊ बापाचा बूट, आई मोठ्याकडे, बाप लहान्याकडे, का अशी ताटातुट? वेचले ज्यांनी आयुष्य करिता मुलांची सेवा, का बरे वाटावे त्यांना म्हातारपण नको ना देगा देवा.. -संतोष पवार

जीभ घसरली

कधी अर्वाच्य भाषेत देतात शिव्या, सगळे विसरून old or young, का बरे आजकाल राजकारण्यांची, नेहमीच होते slip of tongue.. कर्जमाफी ची वाट बघून, शेतकरी होत आहे daily hung, त्यावरही राजकारण करून, ह्यांची होते आहे slip of tongue.. समाजाची सेवा करून, बनले पाहिजे hero unsung, हे जनतेत कमी फ्लेक्स वर जास्त, त्यावरही ह्यांची slip of tongue.. राजकारणात कोणी ना मित्र ना शत्रू, पक्ष बदलून ह्यांचे होते pendulum swung, घरी ठेऊन येतात लाज आणि शरम, रोजचेच झाले आहे slip of tongue.. -संतोष पवार