प्रेम

ओढ तुझी, आस तुझी,
जसा निद्रेचा भुकेला मी कुंभकर्ण..

मी ही स्वप्नी तुला शोधिले,
द्वेषास न पात्र हा काळा वर्ण..

फांदीला ही प्रेम जडले,
ना सोडवी ते पिकलेले पर्ण..

एकदा प्रेमाने जिंकू दे बोल
पत्करील मी ही लढाई हरणं..

माग तुला जे हवे ते सखे,
प्राणही देईल हा दानवीर कर्ण..

जीव हा माझा गुंतला तुझ्यात,
मान डोलावून कर एकदा उत्तीर्ण..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी