सारे कसे क्षणभंगुर

फुलावर मध
मधेतील गोड़वा
आले फुलपाखरू
गेला गोड़वा, फुल एकाकी
सारे कसे क्षणभंगुर..

पाणीदार डोळे
डोळ्यातील प्रेम
आले अश्रु
गेले वाहून प्रेम, डोळे स्वच्छ
सारे कसे क्षणभंगुर..

माणसाची मानुसकी
मानुसकी मधले आपलेपण
आला पैसा
मेली मानुसकी, जिंकला स्वार्थ
सारे कसे क्षणभंगुर..

दाटले ढग
ढगातील वर्षा
कोसळला अवेळी
पिकांचा नायनाट, शेतकरी फासावर
सारे कसे क्षणभंगुर..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी