समुद्र
न बोलता ही सांगून जातात
खुप काही समुद्राच्या लाटा,
दिशा नसताना ही स्वतः शोधतात
क्षितिजा पालिकडच्या वाटा..
खुप काही समुद्राच्या लाटा,
दिशा नसताना ही स्वतः शोधतात
क्षितिजा पालिकडच्या वाटा..
निरंतर राग आणि शांत पणाची
भरती आणि ओहोटी,
सामावून घेतो प्रत्येक गोष्ट
असो मोठी वा छोटी..
तू माणसाचे आणि पक्षांचे ही
लज्जतदार खाद्य,
तुझ्या लाटा म्हणजे नाचण्याच्या गाण्यावर
वाजवलेले सुरेल वाद्य..
तू कधी प्रेमळ, कधी रागीट
तर कधी होतोस एकदमच भयंकर,
किती वर्षाचा आहेस तू?
बाळ, तरुण की एकदमच वयस्कर..
-संतोष पवार
भरती आणि ओहोटी,
सामावून घेतो प्रत्येक गोष्ट
असो मोठी वा छोटी..
तू माणसाचे आणि पक्षांचे ही
लज्जतदार खाद्य,
तुझ्या लाटा म्हणजे नाचण्याच्या गाण्यावर
वाजवलेले सुरेल वाद्य..
तू कधी प्रेमळ, कधी रागीट
तर कधी होतोस एकदमच भयंकर,
किती वर्षाचा आहेस तू?
बाळ, तरुण की एकदमच वयस्कर..
-संतोष पवार
Comments
Post a Comment