जीभ घसरली

कधी अर्वाच्य भाषेत देतात शिव्या,
सगळे विसरून old or young,
का बरे आजकाल राजकारण्यांची,
नेहमीच होते slip of tongue..

कर्जमाफी ची वाट बघून,
शेतकरी होत आहे daily hung,
त्यावरही राजकारण करून,
ह्यांची होते आहे slip of tongue..

समाजाची सेवा करून,
बनले पाहिजे hero unsung,
हे जनतेत कमी फ्लेक्स वर जास्त,
त्यावरही ह्यांची slip of tongue..

राजकारणात कोणी ना मित्र ना शत्रू,
पक्ष बदलून ह्यांचे होते pendulum swung,
घरी ठेऊन येतात लाज आणि शरम,
रोजचेच झाले आहे slip of tongue..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी