काडीमोड
कोंबडा कोंबडीचे झाले भांडण,
कोंबडीने केले कोंबड्याच्या वागण्याचे खंडण,
तिला मोडायची होती कोंबड्याची खोड,
कोर्टात गेली आणि बोलली पाहिजे काडीमोड..
न्यायाधीश महाराज होते शांत,
साक्षीला बोलावून घेतले तालुक्याचे प्रांत,
कोंबडा रडून बोलला चूक झाली घोड,
कोंबडी ऐकेना बोलली पाहिजे काडीमोड..
वकील लागले मांडू कोंबडीची बाजू,
वैयक्तिक प्रश्न ऐकून तीही लागली थोडीशी लाजू,
बोलले दाखव तुला केलेली कोंबड्याने मारझोड,
शारीरिक हिंसेला नाही माफी, नक्कीच मिळेल काडीमोड..
कोंबडा आता लागला करायला गयावया,
पिल्लांची शपथ घेऊन बोलला खूप करील माया,
माफ कर मला आणि राग आता सोड,
मरून जाईल मी जर मागशील तू काडीमोड..
कोंबडीला ही आठवल्या गोष्टी जुन्या ,
प्रेमाने हसून म्हणायची माझा सोन्या,
कोर्टात म्हणाली आमचे साहेब आहेत तसे गोड,
घेते अर्ज मागे, नको आता कधी काडीमोड..
-संतोष पवार

Comments
Post a Comment