!!निवडणूक निकाल स्पेशल!!

बोक्याला दिसेल आता आपली साथीदार मांजरात,
माकड बोलेल जास्त फरक नाही आपल्यात आणि वानरात,
गायीला अचानक आपला बाब्या दिसायला लागेल वासरात,
डोळे होतील पारदर्शक, कारण विटामिन ए असते गाजरात..


फोडणारे हातच रंगवतील गुलालाने थोबाड,
आता मिळून मिसळून भरतील पाच वर्ष घबाड,
घोटाळा झालाच तर पेटवून देतील कार्यालयातील कबाड,
आता सगळेच होतील सोज्वळ, कोणीच नाही उरणार लबाड..

होतील वैरी ही एकत्र आणि करतील प्रेमाने संसार,
आकडे जुळवण्यात आहेत हे एकदम माहीर आणि हुशार,
जुनी लावलेली रोपे उखडून करतील पेरणी दुबार,
लोकांनी निवडून दिलेला मात्र पाच वर्ष होईल पसार..
- संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी