चला ना राया थंड हवेच्या ठिकाणी..
सूर्य मारतोय जोरात थापडी,
कानाखाली होतंय लाल..
अंग सोडतंय डिस्टिल्ड पाणी,
टॅन झालेत हात आणि गाल..
लाही लाही झाली अंगाची,
वाजली तोंडाची पिपाणी,
चला ना राया जाऊन येऊ थंड हवेच्या ठिकाणी..
बिच्चारा पंखा ही दमला घालून हवा,
अंगाला हात लावला की वाटतो गरम तवा..
स्वयंपाक करताना घामाने होई खारट भाजी,
ताटात वाढली की ना कळे शिळी आहे की ताजी..
लग्ना आधी तर बोलले होतात
ठेवील तुला जशी राजाची राणी,
चला ना राया जाऊन येऊ थंड हवेच्या ठिकाणी..
दुपारी बाहेर पडायची नाही राहिली सोय,
कूलर, एसी बिघडल्या सारखे वाटतोय..
फ्रिज मधल्या ही सारख्या संपतात पाण्याच्या बाटल्या,
वीजबिल बघून मात्र पर्सही माझ्या फाटल्या..
शेवटचे सांगते नाहीतर येईल घरात आणीबाणी,
चला ना राया जाऊन येऊ थंड हवेच्या ठिकाणी..
-संतोष पवार

Comments
Post a Comment