पहिला पाऊस


थेंब ओघळतो बटांवरी तुझ्या,
चेहर्या वरी त्या पारंब्यांचे झोके..
शब्दांची ही बसेल वाचा,
खूप काही बोलूनही भासतात मुके..


ओघळताना कधी येती गालावरी,
सौंदर्याने ते तुझ्या रस्ता चुके..
नयनांना झाके गालिचा मखमली,
रिमझिम पावसातील दाट धुके..

हळूवार स्पर्शा ने रोमांच जागवी,
हृदयी ठाव घ्यायला ते ही भुके..
करशील जरी बटा कोरड्या,
ओले मन जिद्दी ते, ठरवूनही ना सुके..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी