।।इलेक्शन स्पेशल।।


बोका म्हणतो आहे ओरबाडू का मांजराला,
आमचाच लाल म्हणते आहे माकड़ वानराला,
गाय म्हणावनारे ओळखत नाहियेत स्वतःच्याच वासराला,
आजकाल जरा जास्तच भाव चढला आहे गाजराला..


कोणी कोणाचे फोड़ते आहे थोबाड़,
कोणी कोणाचे काढ़ते आहे बाहेर घबाड़,
जाहीरनाम्या च्या नावा ख़ाली वाटत आहेत कबाड़,
जनता मात्र ओळखून आहे कोण आहे सगळ्यात लबाड़..

कोणी घालतो आहे शपथ तर कोणी साकड़े,
हा माझा तो तुझा कमी जास्त करत आहेत आकड़े,
कोणाला म्हणत आहेत मावळा तर कोणी खंडू खोपड़े,
शेवटी ज्या झाडाला जास्त फळे त्यावर सगळ्यात जास्त माकड़े..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी