फांदीची व्यथा

फांदी बोले पानाला
तुझ्यामुळे नाही बघत कोणी मला,
दिसायला ही तूच सुंदर
खरबुडे अंग मात्र दिले मजला..

तुझ्या हळुवार स्पर्शाने
येती अंगावर रोमांच,
मला तर दूरवरून बघूनही
येई अंगाला खाज उगाच..

तू कधी हिरवा, कधी पिवळा
कधी सोनेरी तर कधी होतोस लाल,
तू पडून गेल्यावर होते मी अजीर्ण
आणि सुकतात माझे गाल..

तू आहेस ताजा तजेलदार
म्हणून आहे मला महत्व,
पण मी जर मान टाकली
तर तुलाही नसेल अस्तित्व..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी