आयुष्याचा सारीपाट

निळ्याशार आभाळात,
वाटून घेऊया तारकांना,
चार तुझ्या, चार माझ्या
मांडुया आयुष्याचा सारीपाट..

कधी येशील बाहेर तू,
तोडुनी फाश आकाशगंगेचे,
झालो जरी उल्का आपण,
खाली येताना तरी नक्कीच पडेल गाठ..

दाट अंधाऱ्या रात्रीही,
निरखूनी दुधाळ तेजोमेघ,
गर्दीतूनी असंख्य तारकांच्या,
शोधुया आपुली प्रकाशमय वाट..

कधी येईल आडवा शनी,
मंगळ ही असुदेत राशी मध्ये,
नभही देतील गर्जूनी संगीत,
मांडूया भातुकलीच्या लग्नाचा थाट..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी