बिनधास्त
वाटते कधीतरी होऊन जावे बिनधास्त,
उधळून दयाव्या साऱ्या मर्यादा..
वेडात दौडलेल्या वीर मराठ्यां सारखे
सुसाट, कशाचीही पर्वा न करता भिडून जावे समस्यांसोबत..
फडशा पाडून टाकावा साऱ्या समस्यांचा,
दोन हात करावे चितपट होई पर्यंत..
मनाला उधाण आल्यागत
वळवाच्या पावसा सारखे धो धो बरसावे
काही क्षणात करावे सगळी कडे पाणी पाणी,
खेळावे चिखलात, माराव्या उडया
गुढगाभर पाय भरे पर्यंत..
मग अचानक झोप मोडते, स्वप्न तुटते
आरशात बघतो तर तोच नकली सभ्यतेचे कवच घालून उभा राहिलेला मीच माझ्यासमोर,
प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत जसा विचारतोय
का नाही होत मग बिनधास्त?
का नाही वागत बिनधास्त?
का नाही जगून बघत एखादा दिवस उनाड पणे??
-संतोष पवार
उधळून दयाव्या साऱ्या मर्यादा..
वेडात दौडलेल्या वीर मराठ्यां सारखे
सुसाट, कशाचीही पर्वा न करता भिडून जावे समस्यांसोबत..
फडशा पाडून टाकावा साऱ्या समस्यांचा,
दोन हात करावे चितपट होई पर्यंत..
मनाला उधाण आल्यागत
वळवाच्या पावसा सारखे धो धो बरसावे
काही क्षणात करावे सगळी कडे पाणी पाणी,
खेळावे चिखलात, माराव्या उडया
गुढगाभर पाय भरे पर्यंत..
मग अचानक झोप मोडते, स्वप्न तुटते
आरशात बघतो तर तोच नकली सभ्यतेचे कवच घालून उभा राहिलेला मीच माझ्यासमोर,
प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत जसा विचारतोय
का नाही होत मग बिनधास्त?
का नाही वागत बिनधास्त?
का नाही जगून बघत एखादा दिवस उनाड पणे??
-संतोष पवार
Comments
Post a Comment