दारिद्र्याचा चेहरा

भूक मागते खायला,
तहान मागते प्यायला..
अंग मागते झाकायला,
गरीबी लावते वाकायला..
कितीही असुदेत कणखर बाणा,
दारिद्र्याचा चेहरा मात्र नेहमीच केविलवाना..


निवाऱ्याला आभाळाचे छत्र,
सोबतिला कोणीही नसतो मित्र,
बायको पोरांचे नुसते हाल,
खळीच्या नावाखाली आत गेलेले गाल,
मोडून पडला आहे पाठीचा कणा,
दारिद्र्याचा चेहरा मात्र नेहमीच केविलवाना..

शाळेत जाइनात पोर भरायला नाही फी,
दप्तर घ्यायलाही पैसे नाही किती बेबस मी..
दरवर्षी जोमाने कसतो मी शेती,
पीके जळून जावून उरते फ़क्त माती..
दुष्ट नभा, बरस रे कधीतरी माझ्या ही अंगना,
दारिद्र्याचा चेहरा मात्र नेहमीच केविलवाना..
-संतोष पवार

Comments

Popular posts from this blog

समुद्र

सारे कसे क्षणभंगुर

माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी