सारे कसे virtual
डोळे उघडले की सारे कसे virtual..
नाती, आपलेपणा, दुरावा सगळे virtual..
प्रेमाची मिठी virtual,
आपल्यांसोबतच्या गाठीभेटी virtual..
रुसवा फुगवा virtual,
आपलेपणाचा जोगवा virtual..
नवीन नात्याचा आरंभ virtual,
चांगल्या कामाचा शुभारंभ virtual..
सण साजरे करणे virtual,
मित्रांच्या घरी भेटायचे ठरणे virtual..
मंदिरांचे आकर्षण virtual,
बाप्पाचे ही दर्शन virtual..
कधी येणार बाहेर आपण ह्या virtual जगातून,
थोडे डोके बाजूला ठेऊन विचार करा हृदयाच्या आतून..
बंद करूया स्वतःचाच स्वतःशी होणारा छळ virtual,
कारण एक दिवस कोणीही नसताना येईल छातीत कळ,
आणि ती नक्कीच नसेल virtual...
-संतोष पवार

Comments
Post a Comment